Kolhapur: सरनोबतवाडीत येथील पुलाचे पाडकाम सुरु, अवजड वाहने जाऊ शकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:27 IST2024-12-10T12:26:48+5:302024-12-10T12:27:15+5:30
मोहन सातपुते उचगाव: पुणे -बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यापीठ- राजाराम तलाव शेजारील भूमिगत पूल पाडण्याचे ...

Kolhapur: सरनोबतवाडीत येथील पुलाचे पाडकाम सुरु, अवजड वाहने जाऊ शकणार
मोहन सातपुते
उचगाव: पुणे -बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यापीठ- राजाराम तलाव शेजारील भूमिगत पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी हा पूल सहा बाय साडेतीन मीटरचा होता. यामुळे अवजड वाहने, कंटेनर या पुलाखाली अडकून पडत होते. आता या ठिकाणी वीस बाय साडे पाच मीटरचा दोन गाळ्याचा अंडर पूल होणार आहे. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, उजळाईवाडी येथील अधिकाऱ्यांनी दिली.
नुकतेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत रोड वें सोल्यूशन यांच्या वतीने उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, लक्ष्मी टेकडी पर्यंतच्या उड्डाण पूल व भूमिगत पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे.
येथे होणार पूल
गांधीनगर, तावडे हॉटेल, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, केआयटी कॉलेज रोड, गोकुळ शिरगाव, कणेरी मठ, कणेरी वाडी, महालक्ष्मी टेकडी पर्यंतचे भूमिगत, उड्डाण पूल होणार आहेत.
सरनोबतवाडी गाव विस्तारत आहे. येथील हा पुल अवजड वाहनाकरिता कुचकामी होता. आता नव्याने दोन गाळ्याचा पूल होणार असल्याने समस्या दूर झाली आहे - दीपक आडसुळ, ग्रामस्थ, सरनोबतवाडी
महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. सर्व्हिस रस्ते साडे सात मिटरचे दोन्ही बाजूंना होणार आहेत. वाढती रहदारी लक्षात घेता ही कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सरनोबतवाडीकडे येणाऱ्या वाहन धारकानी उचगाव पुलाकडे वळावे व उचगावकडून सरनोबतवाडीकडे येणाऱ्या वाहनधारकांनी उजळाईवाडी पुलाकडून यावे - चद्रकांत बरडे, वरिष्ठ अधिकारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,उजळाईवाडी