रंकाळा उद्यानातील रोबोटिक शिल्पांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:06+5:302021-04-07T04:26:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसर उद्यान येथे नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी महापालिकेच्यावतीने बसविण्यात आलेल्या रोबोटिक शिल्पांची अज्ञातांकडून मोडतोड ...

Demolition of robotic sculptures in Rankala Park | रंकाळा उद्यानातील रोबोटिक शिल्पांची तोडफोड

रंकाळा उद्यानातील रोबोटिक शिल्पांची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसर उद्यान येथे नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी महापालिकेच्यावतीने बसविण्यात आलेल्या रोबोटिक शिल्पांची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली आहे. या शिल्पाचे उद्घाटन होऊन आठ दिवसही झाले नाहीत तोवरच त्याची मोडतोड करण्यात आल्यामुळे नागरिकांतूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांच्या तोच पर्यटकांच्या विरंगुळयासाठी महापालिकेच्यावतीने रोबोटिक शिल्प बसविण्यात आली आहेत. त्यामध्ये हत्ती, पाणगेंडा, जात्यावरील लक्ष्मी, गवा रेडा, मगर इत्यादी रोबोटिक शिल्पे साकारण्यात आलेली आहेत. या शिल्पापैकी हत्ती या शिल्पाची सोंड तर म्हैस या शिल्पाचे डावे शिंग व शेपूट मोडून अज्ञाताने अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान केलेले आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे यांनी अज्ञाताविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Demolition of robotic sculptures in Rankala Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.