पंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:04 IST2020-05-28T19:02:45+5:302020-05-28T19:04:30+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली.

पंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
कोल्हापूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली.
प्रात्यक्षिकांमध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या तीन टेबल रबर बोट, तीन मशीन लाईफ जॅकेट लाईव्ह, इर्मजन्सी लाईट रोप,आदी साहीत्याच्या मदतीने करवीर, भुदरगड, राधानगरी, हातकंणगले, शिरोळ तालुक्यातील आपदा मित्र, आपदा सखी, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
यात प्रामुख्याने पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जर बोट नसेल तर दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर कसे काढावयाचे, त्याला प्रथमोचार कसे द्यायचे, त्याला चरणी वाहून कसे न्यायचे, वैद्यकीय उपचार आदी बाबींचा समावेश होता.
यावेळी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीरचे तहसिलदार शितल भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.