शिरोळमध्ये पाठिंब्यावरून राजकीय शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:46+5:302021-05-03T04:18:46+5:30

शिरोळ : गोकुळ निवडणुकीसाठी शिरोळ तालुक्यातून शंभर टक्के मतदान झाले. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे ...

Demonstration of political power with support in Shirol | शिरोळमध्ये पाठिंब्यावरून राजकीय शक्तिप्रदर्शन

शिरोळमध्ये पाठिंब्यावरून राजकीय शक्तिप्रदर्शन

Next

शिरोळ : गोकुळ निवडणुकीसाठी शिरोळ तालुक्यातून शंभर टक्के मतदान झाले. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे शिरोळ येथील मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची इर्ष्या दिसून आली. वाहनातून आलेल्या दोन्ही आघाडीतील ९१ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे उर्वरित ४२ मतदारांची आकडेमोड सुरू असली तरी दोन्ही आघाडींनी बहुमताचा दावा केला आहे.

येथील श्री पद्माराजे विद्यालयात दोन केंद्रांवर मतदान झाले. दुपारी दोन वाजता शेवटचे मतदान झाले. १३३ पैकी सात कोरोनाबाधित मतदारांचेही मतदान झाले. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या मतदारांचे कारखान्याच्या प्रवेशव्दारासमोर दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, अनिल यादव, स्वरुपा पाटील-यड्रावकर या प्रमुख नेत्यांसह अन्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार सुजित मिणचेकर, अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, काँग्रेसचे सर्जेराव शिंदे, रामचंद्र डांगे, पृथ्वीराज यादव यांच्यासह दोन्ही आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

...........

यड्रावकरांनी मारला ठिय्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते व राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदान केंद्राच्या ठिकाणी ते ठिय्या मारून होते.

एकत्र मतदार आणि उत्सुकता

अकरा वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे भेट दिली. यावेळी ३८ ठरावधारक मतदार एकाचवेळी पांढऱ्या टोप्या घालून मतदानासाठी आले होते. तर दोन ट्रॅव्हल्समधून आलेल्या विरोधी गटातील मतदारांनी पिवळी टोपी, मास्क व मफलर परिधान केले होते. यावेळी अन्य वाहनातून आलेल्या मतदारांसह ५३ जणांनी मतदान केले. यावेळी मतदारांच्या आकडेमोडीची चर्चा रंगली होती.

शंभर टक्के मतदान

एकूण मतदान - १३४

मयत - एक

झालेले मतदान - १३३

फोटो - ०२०५२०२१-जेएवाय- , ०४, ०५ फोटो ओळ -शिरोळ येथे मतदान केंद्रावर माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन संवाद साधला. ०५) शिरोळ येथे विरोधी आघाडीचे ठरावधारक मतदारांनी ट्रॅव्हल्समधून मतदान केंद्रावर प्रवेश केला.

Web Title: Demonstration of political power with support in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.