आजऱ्यातील बोटी सुस्थितीत असल्याची प्रात्यक्षिकाद्वारे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:52+5:302021-06-09T04:31:52+5:30
आजरा : आजरा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर योग्य पद्धतीने मात करता यावी, यासाठी आजरा तालुक्याला मिळालेल्या बोटी सुस्थितीत ...
आजरा : आजरा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर योग्य पद्धतीने मात करता यावी, यासाठी आजरा तालुक्याला मिळालेल्या बोटी सुस्थितीत आहेत किंवा नाही, याची प्रात्यक्षिकाद्वारे पाहणी करण्यात आली. हिरण्यकेशी नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बोटींची तपासणी व टास्क फोर्सच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आजरा तालुक्याला दोन बोटी मिळाल्या आहेत. या बोटी सुस्थितीत आहेत किंवा नाहीत, याची तपासणी, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आज टास्क फोर्सच्यावतीने करण्यात आले. तालुक्याला मिळालेल्या बोटी सुस्थितीत असून, तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर योग्य पद्धतीने मात करता येऊ शकेल, अशी आशा निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी व महसूल नायब तहसीलदार संजय इळके यांनी व्यक्त केली.
यावेळी आजरा नगर पंचायतीचे कर्मचारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांना बोटीतून पूरपरिस्थितीवेळी घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी महसूल नायब तहसीलदार संजय इळके, निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी, महसूल सहाय्यक पी. व्ही. नागरगोजे, गौस मकानदार, आजरा नगर पंचायतीचे संतोष कांबळे, धीरज ससाणे यांच्यासह टास्क फोर्सचे कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळी : आजऱ्यातील हिरण्यकेशी नदीत पूर परिस्थितीचे प्रशिक्षण घेताना महसूलचे अधिकारी व कर्मचारी.
क्रमांक : ०७०६२०२१-गड-०४