सीपीआरमधील सहायक डॉक्टरांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:22 PM2020-11-04T19:22:02+5:302020-11-04T19:29:14+5:30
CprHospital, doctor, kolhapurnews कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी वैद्यकिय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टरांचा (सहाय्यक प्राध्यापक) संप तिसर्या दिवशी सुरुच राहिला. बुधवारी सायंकाळी संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनासमोर निदर्शने करुन पाठींबा दर्शवला.
कोल्हापूर : कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी वैद्यकिय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टरांचा (सहाय्यक प्राध्यापक) संप तिसर्या दिवशी सुरुच राहिला. बुधवारी सायंकाळी संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनासमोर निदर्शने करुन पाठींबा दर्शवला.
कोरोना कालावधीत सलग आठ महिने अस्थायी डॉक्टरांनी तुटपुज्या वेतनावर सेवा बजावली आहे, त्यामुळे अस्थायी डॉक्टरांना सेवेत कायम सामावून घ्यावे आदी मागण्यासाठी अस्थायी डॉक्टरांचे सामुहिक रजा टाकून राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. बुधवारी आंदोलनाच्या तिसर्या दिवशीही शासनाने निर्णय न घेतल्याने काम बंद आंदोलन सुरुच राहीले.
कोल्हापूरात सीपीआरमधील रा. छ. शा. म. शा. वैद्यकिय महाविद्यालयातील ३२ अस्थायी डॉक्टर (सहायक प्राध्यापक) सामुहिक रजा टाकून आंदोलनात सहभागी झाले आहे. या संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी बुधवारी काळ्या फिती लावून काम केले व सायंकाळी सीपीआरसमोर निदर्शने केली. गुरुवारी वैद्यकिय महाविद्यालयासमोर सर्व अस्थायी डॉक्टर सकाळपासून धरणे आंदोलन करणार आहेत.
रुग्णसेवेवर काहींसा परिणाम
अस्थायी डॉक्टरांचा संप असला तरही सीपीआरमध्ये सद्या २९ वैद्यकिय अधिकारी व ९० निवासी वैद्यकिय अधिकारी सद्या सेवा बजावत आहेत. तसेच कोवीडचा संसर्ग कमी होऊ लागल्याने सीपीआर रुग्णालयात कोरोनासह इतर रुग्ण असे एकूण फक्त ११६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्णसेवेवर काहींसा परिणाम झाला आहे.
अस्थायी डॉक्टरांच्या संपाच्या तिसर्या दिवशी बुधवारी सायंकाळी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहाय्यक वैद्यकिय अधिकार्यांनी निदर्शने केली.