प्रात्यक्षिके, मार्गदर्शनाने शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:13+5:302021-06-22T04:18:13+5:30
शिवाजी विद्यापीठातील ऑनलाईन प्रात्यक्षिकांत ११०० जणांचा सहभाग शिवाजी विद्यापीठातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्वरुपात आयोजित योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यात ...
शिवाजी विद्यापीठातील ऑनलाईन प्रात्यक्षिकांत ११०० जणांचा सहभाग
शिवाजी विद्यापीठातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्वरुपात आयोजित योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह सुमारे ११०० जण सहभागी झाले.योग प्रशिक्षक सूरज पाटील यांनी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ यूट्यूब वाहिनीवरून योग साधकांना एक तास योग प्रात्यक्षिके दाखविली. विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र ,आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी ऑनलाईन स्वरुपात योग मार्गदर्शन व्याख्यान घेण्यात आले. योग प्रशिक्षक श्वेतलीना पाटील यांनी ‘आनंददायी जीवनासाठी योग’ या विषयावर मार्गदर्शन केले. अतुल एतावडेकर यांनी आभार मानले.
भाजपतर्फे विविध ठिकाणी प्रात्यक्षिके, मार्गदर्शन
शहरातील मंगळवारपेठेतील बालेकिल्ला तरुण मंडळ हॉल, शिवाजीपेठेतील डॉ.सोलापूरकर हॉस्पिटल, फुलेवाडी येथील फ्रेंडशिप कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, शाहुपुरीतील आत्मदर्शन हॉल, राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ हॉल, टेंबलाईवाडी मंदिर येथील हॉल, उत्तरेश्वरपेठेतील जोशी गल्ली समाज मंदिर हॉल, कसबा बावडा येथील लाईन बाजार आणि पॅव्हेलियन हॉल, लक्ष्मीपुरी मंडलतर्फे ओम गणेश मंगल कार्यालय, शिवस्वरूप अपार्टमेंट (पाण्याचा खजिना) येथे भाजप आणि ताराराणी आघाडीच्यावतीने योग प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. योग साधनेची शपथ घेण्यात आली. सर्व ठिकाणच्या कार्यक्रमाची सांगता विश्वशांती प्रार्थना करून करण्यात आली. उपस्थितांना आयुर्वेदिक शतावरी काढा देण्यात आला. या उपक्रमात भाजपा प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, केदार मुनीश्वर, अशोक देसाई, राजू मोरे, गणेश देसाई, दिलीप मेत्राणी, आशिष कपडेकर, प्रशांत घोडके, उमा इंगळे, विजय जाधव, भाग्यश्री शेटके, रवींद्र मुतगी, भरत काळे, रंगराव सूर्यवंशी, आदी सहभागी झाले.
जरग फाऊंशनकडून ऑनलाईन स्पर्धा
जरगनगर येथील जरग फाऊंडेशनने ऑनलाइन योग स्पर्धा घेतली. त्यात आयुष मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीमधील कोणतेही एक आसन करत त्याचे फायदे सांगणारा व्हिडिओ करायला सांगितला होता. त्यामध्ये विविध वयोगटातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
महावीर महाविद्यालयात योग प्रात्यक्षिके
महावीर महाविद्यालयाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्याचे उद्घाटन बी. एम. रोटे ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख प्रा. राजेंद्र हिरकुडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थिनी अस्मिता चौगुले हिने योगाविषयी माहिती दिली. ऐश्वर्या शिंदे हिने योग प्रात्यक्षिके केली. यावेळी डॉ. बाबासो उलपे, प्रा. संजय ओमासे, राहुल आडके उपस्थित होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित पाटील, प्रा. स्वप्निल खोत यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.