सीपीआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:32+5:302021-04-16T04:23:32+5:30
कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीसाठी येथील ...
कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीसाठी येथील सीपीआरमधील ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरूवारी काम बंद ठेवले. सकाळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. याठिकाणी केवळ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याने तुलनेत संपाची तीव्रता जाणवली नाही.
राज्यातील १८हून अधिक शासकीय रूग्णालये ही वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चालविण्यात येतात. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना अजूनही शासकीय सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. कोरोना काळात अतिशय महत्त्वाची जबाबदारी या सर्वांनी सांभाळली. त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांना निवेदन देण्यात आले. संध्याकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा करण्यात आली.
१५०४२०२१ कोल सीपीआर ०१
सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात गुरुवारी निदर्शने केली.