शिक्षक बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:41+5:302021-03-08T04:23:41+5:30
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी रविवारी बँकेच्या दारात निदर्शने केली. बँकेतील कर्मचाऱ्यांचे ...
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी रविवारी बँकेच्या दारात निदर्शने केली. बँकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कायद्यानुसार ५८ असताना ५५ वर्षे केले. आर्थिक स्थितीचा विचार न करता व बँकिंग प्रणालीचा अभ्यास न करता कर्जाचे व्याजदर १५ वरून १२ टक्के केले. यामुळे बँकेला नुकसान झाल्याचे युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी यावेळी सांगितले.
बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यातील फरक रक्कम २०१२ पासून देय आहे. न्यायालयाने निकाल देऊनही बँक व्यवस्थापनाकडून ही बाब न्यायप्रविष्ट करून प्रलंबित ठेवली जात आहे. कर्मचाऱ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे. याबाबत व्यवस्थापनाशी अनेक वेळा चर्चा होऊन मार्च २०२० नंतर फरक रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्याची पूर्तता केलेली नसल्याचे निदर्शने केल्याचे पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांनी रविवारी बँकेच्या दारात निदर्शने केली. (फोटो-०७०३२०२१-कोल- बँक)