अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:53 PM2020-11-02T16:53:35+5:302020-11-02T16:55:47+5:30

Cprhospital, doctor, kolhapurnewes शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांनी (सहाय्यक प्राध्यापक) आपली सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले. राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापूरात रा. छ. शा. म. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील सुमारे ३२ हून अधिक अस्थायी डॉक्टरांनी सहभाग घेतला. सकाळी महाविद्यालय अधिष्ठांतांच्या दालनासमोर डॉक्टरांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

Demonstrations of temporary doctors in CPR, agitation by throwing away collective leave | अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन

अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन सेवा नियमीत करण्याची मागणी

कोल्हापूर : शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांनी (सहाय्यक प्राध्यापक) आपली सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले. राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापूरात रा. छ. शा. म. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील सुमारे ३२ हून अधिक अस्थायी डॉक्टरांनी सहभाग घेतला. सकाळी महाविद्यालय अधिष्ठांतांच्या दालनासमोर डॉक्टरांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने सहाय्यक प्राध्यापक अस्थायी स्वरुपात कार्यरत आहेत. कोरोना महामारीत त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेत सेवा बजावली. सेवा नियमितीच्या मागणीसाठी त्यांनी दि. १५ व १६ आॅक्टोबरला काळी फीत लावुन आंदोलन केले. मात्र शासनाकडून दखल न घेतल्याने अस्थायी डॉक्टरांनी सोमवारपासून सामुहिक रजा आंदोलन सुरु केले. आंदोलन दरम्यान, सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व सहायक प्राध्यापकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली.

आंदोलनात, डॉ. योगेश पाटील, डॉ. रोहित लोखंडे, डॉ. निखिल जगताप, डॉ. मनोज पाटेकर, डॉ इषा जाधव, डॉ. शिरीन अत्तार व इतर सर्व सहाय्यक प्राध्यापक यांनी, सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन राज्यभर सुरु राहील असा इशारा निदर्शने करताना आपल्या भाषणातून दिला.

बुधवारपासून वैद्यकिय अधिकारी सहभागी
आंदोलनाची दखल न घेतल्यास बुधवारपासून आंदोलनात महाविद्यालयातील वैद्यकिय अधिकारी सहभागी होत आहेत. त्यानंतर मात्र रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली जाण्याची शक्यता आहे.

मागण्या...

१. तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करून त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.
२. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन नियुक्ती करावी.
३. त्यांना तात्काळ सातव्या वेतनाप्रमाणे वेतन द्यावे, रुजू दिवसापासून ते आजपर्यत पगारातील फरक मिळावा.

 

Web Title: Demonstrations of temporary doctors in CPR, agitation by throwing away collective leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.