कसबा बावडा परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:52+5:302021-02-05T07:16:52+5:30

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य व कीटकनाशक विभागामार्फत कसबा बावडा परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण ...

Dengue, Chikungunya survey in Kasba Bawda area | कसबा बावडा परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या सर्वेक्षण

कसबा बावडा परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या सर्वेक्षण

Next

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य व कीटकनाशक विभागामार्फत कसबा बावडा परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी ३२४५ घरांतील ५४२२ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ५४ ठिकाणी डास-अळी आढळून आल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दूषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले.

महापालिकेच्यावतीने खासगी एजन्सीमार्फत २५ बिडिंग चेकर्स नेमण्यात आले आहेत. आरोग्य निरीक्षक, मुकादम, डासअळी सर्वेक्षण कर्मचारी यांच्यासोबत या बिडींग चेकर्सनी सावरकर गल्ली, माळ गल्ली, पिंजार गल्ली, आंबेडकर नगर, संकपाळनगर, आंबेगल्ली, बलभीम गल्ली, शिंदे गल्ली, जयभवानी गल्ली, कागलवाडी, वाडकर गल्ली, उलपे गल्ली, चौगुले गल्ली, शिवतेज गल्ली, गणेश कॅलनी, धनलक्ष्मी कॉलनी, शिवसम्राट, रणदिवे गल्ली, उलपेमळा, नेजदार कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, डी. वाय. पाटील कॉलेज मेन रोड, स्वराज कॉलनी, राजाराम कॉलनी, शहाजीनगर, आदी परिसरातील घरांतून डास-अळीचे सर्वेक्षण केले आले.

डेंग्यू, चिकुनगुण्याची लक्षणे आढळल्यास महापालिका आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे.

Web Title: Dengue, Chikungunya survey in Kasba Bawda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.