कोल्हापुरात १५३ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:14+5:302021-06-26T04:18:14+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ येऊ नये, यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शुक्रवारी शहरातील सात प्रभागांमध्ये २,११२ नागरिकांच्या ...
कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ येऊ नये, यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शुक्रवारी शहरातील सात प्रभागांमध्ये २,११२ नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.
यामध्ये ३,४०४ कंटेनरचे सर्वेक्षण करताना १५३ ठिकाणी डेंग्यूसदृश्य डास अळी आढळल्या. यावेळी दूषित पाण्याच्या ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली.
शहरातील काही मिळकतींमधील बेंसमेंटमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या मिळकतींच्या बेंसमेंटमध्ये पाणी साचून राहते, त्या मिळकतधारकांनी तातडीने पाणी उपसा करून घ्यावे. तसेच ज्या खासगी जागेमध्ये अस्वच्छता निर्माण झालेली आहे अथवा झाडेझुडपे वाढलेली आहेत, त्या मिळकतधारकांनी आपली जागा स्वच्छ करून घ्यावी अन्यथा महापालिकेतर्फे संबंधित मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.