गडहिंग्लज तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:56+5:302021-06-22T04:17:56+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या काही रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासन सतर्क ...

Dengue-like patients in Gadhinglaj taluka | गडहिंग्लज तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण

गडहिंग्लज तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण

Next

गडहिंग्लज :

गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या काही रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून तरुण मंडळांच्या सहकार्याने शहरात तातडीने विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सोमवारी (२१) सकाळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे सभापती महेश कोरी यांनी आरोग्य विभाग व तरुण मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत प्रभागनिहाय स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या.

पालिकेचे कर्मचारी व मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी घरातील उघड्या टाक्या, परसातील रिकाम्या कुंड्या, टायर, अडगळीचे साहित्य यामध्ये साचून राहिलेले पाणी रिकामे करणे, उघड्या टाक्यांवर झाकण लावण्याचे काम सुरू केले आहे.

या मोहिमेत अमजद मीरा, महेश घुगरे, मिलिंद कोरी, पंकज भैसकर, राजू जाधव, प्रशांत कित्तूरकर, संदीप पाटील, सूरज गवळी, इम्रान मुल्ला, इम्रान चाँद, सादिक लमतुरे यांच्यासह गांधीनगर युथ सर्कल, शिवाजी चौक तरुण मंडळ, न्यू आझाद हेल्थ क्लब, लकी ग्रुप, रासाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

चौकट :

ग्रामपंचायतींना सूचना

ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी औषध फवारणी, गटारींची स्वच्छता, गाव वस्तीजवळ साचलेली डबकी रिकामी करणे किंवा त्यावर औषध फवारण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना आणि तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

- डॉ. एम. व्ही. अथणी, तालुका आरोग्य अधिकारी.

चौकट : डेंग्यूची साथ पसरू नये म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात प्रभागनिहाय स्वच्छता आणि औषध फवारणीसह जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

- महेश कोरी, उपनगराध्यक्ष, गडहिंग्लज.

Web Title: Dengue-like patients in Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.