डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम, महापालिका: १३ पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:39 PM2019-11-12T16:39:06+5:302019-11-12T16:40:38+5:30
कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत.
कोल्हापूर : शहरामध्ये पुन्हा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवित आहे. १३ पथके तयार केली आहेत. एकाच वेळी १३ प्रभागांत उपाय योजना केल्या जात आहेत.
पथकांमार्फत तापाच्या रुग्णांचे सर्व्हे करणे, डास अळी सर्वेक्षण करणे, औषधे फवारणी करणे, धूर फवारणी करणे, साचलेल्या पाण्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, टायर जप्ती मोहीम घेणे, नागरिकांमध्ये जनजागृत्ती करणे, अशी कामे केली जात आहेत.
९ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पथक शहरातील ८१ प्रभागांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविणार आहे. १३ आरोग्य विभागांकडील १३ सॅनिटेन वॉर्ड तसेच नागरी आरोग्य केंद्र असे हे पथक आहे. महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तरी नागरिकांनाही परिसरामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले आहे.
शहरामध्ये पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणाही कामाला लागली आहे. प्रत्येक ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.