कळंबा परिसरात डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:03+5:302021-09-02T04:50:03+5:30

कळंबा : कोरोनाचे संकट कमी होण्याचे नाव घेत नसतानाच कळंबा परिसरात आता डेंग्यू आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने ...

Dengue sting in Kalamba area | कळंबा परिसरात डेंग्यूचा डंख

कळंबा परिसरात डेंग्यूचा डंख

googlenewsNext

कळंबा : कोरोनाचे संकट कमी होण्याचे नाव घेत नसतानाच कळंबा परिसरात आता डेंग्यू आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कळंब्या लगतच्या राजलक्ष्मीनगर, तपोवन, सुर्वेनगर, साळोखेनगर, जीवबानाना पार्क, कळंबा जेल, साने गुरुजी वसाहत, कनेरकरनगर, रंकाळा तलाव, संभाजीनगर प्रभागात डेंग्यू, सर्दी, ताप, अतिसार या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.

वातावरणातील बदलांसह कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाई अभावी घनकचऱ्याने ओसंडून वाहणारे नाले, सांडपाणी निर्गतीकरण करणाऱ्या गटारी विकसित नसल्याने कोठेही कसेही वाहणारे सांडपाणी, अविकसित रस्त्यावर पसरलेली दलदल यामुळे साथीच्या आजारात मोठी भर पडली आहे. धूरफवारणी, औषधफवारणी झाल्याचे आठवत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे फ्लूसदृश लक्षण असणारे दवाखान्यात उपचारासाठी जाणारे जास्त आहेत. बहुतांश माध्यमिक शाळा सुरू असल्याने पालकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या परिसरातील साथीच्या आजारांवर उपाययोजना करा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Dengue sting in Kalamba area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.