पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:05+5:302021-08-19T04:27:05+5:30
गारगोटी : कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील भात, भुईमूग व नाचणी पिकांच्या तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा आयोजित ...
गारगोटी : कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील भात, भुईमूग व नाचणी पिकांच्या तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करून यात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२१मध्ये भुदरगड तालुक्यात भात, भुईमूग व नाचणी या पिकांच्या पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या पीक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे जमीन असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेसाठी ३०० रुपये शुल्क राहील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, ७/१२, खाते उतारा व प्रवेश शुल्क भरल्याचे चलन या कागदपत्रांसह आपला अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा. अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले यांनी केले आहे.