विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:13 AM2018-10-22T01:13:18+5:302018-10-22T01:13:22+5:30

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत ...

Department's outstanding amount of Rs 747 crore | विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

googlenewsNext

नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत राज्यात २५ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात कोल्हापूर विभागाचा वाटा ७४७ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या थकबाकीत १२५ कोटी रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर, सांगलीसारख्या सधन जिल्ह्यांनी बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने ‘महावितरण’च्या कारभाराचा डोलारा सांभाळायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
सध्या पाणी व कोळशाच्या अपुºया पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती घटल्याने राज्यात २५00 मेगावॅटचा तुटवडा आहे. परिणामी राज्यभरात भारनियमन सुरू असून शेतीपंपासाठीच्या पुरवठ्यातही दोन तासांनी कपात केली आहे. शेतीपंपाची थकबाकी वसूल होत नसल्यानेही त्यांच्या पुरवठ्यात कपात केली जात आहे. आॅगस्टअखेर कोल्हापूर विभागात ६२३ कोटींची थकबाकी होती. आतापर्यंत ती ७४७ कोटींवर गेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यांची १६४, तर सांगलीची ५८२ कोटी इतकी थकबाकी झाली आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा ही थकबाकी कमी असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. सोलापूर, नगर, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी हजार ते १५०० कोटींच्या वर थकबाकी असून वसुली होत नसल्याने त्याचा सेवेस फटका बसत आहे. कृषी संजीवनी योजनेसारखी सवलत पुन्हा लागू होईल, या अपेक्षेने बिले भरण्याकडे कानाडोळा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वसुलीला ब्रेक
‘महावितरण’ने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली, पण ही कनेक्शन तोडू नयेत, असे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी काढले आहेत. ट्रान्स्फॉर्मर जळाला तर २५ हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना तीन हजार, तर त्यावरील थकबाकी असणाºयांकडून पाच हजार रुपये भरून ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून वीजजोडणी पूर्ववत करण्याचेही आदेशात म्हटले आहे. यानंतर वसुली थांबली असून, विभागात एप्रिलपासून केवळ नऊ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत.
जिल्हा कृषिपंप थकबाकी
कोल्हापूर १ लाख ४३ हजार २६१ १६४ कोटी
सांगली २ लाख २५ हजार ८६४ ५८२ कोटी

Web Title: Department's outstanding amount of Rs 747 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.