कौलव येथील वारकऱ्यांचे पंढरपूरला प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:45+5:302021-08-25T04:28:45+5:30
कोरोना महामारीच्या काळामध्ये शेकडो वर्षांच्या आषाढी यात्रा काळात भोपळवाडी, बरगेवाडी, पिंपळवाडीसह कौलव परिसरात वारकरी सांप्रदायिकतेचा मोठा वर्ग आहे. आषाढी ...
कोरोना महामारीच्या काळामध्ये शेकडो वर्षांच्या आषाढी यात्रा काळात भोपळवाडी, बरगेवाडी, पिंपळवाडीसह कौलव परिसरात वारकरी सांप्रदायिकतेचा मोठा वर्ग आहे. आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो भाविक जात असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर आषाढी, कार्तिकी यात्रा बंद आहे. शेतात राबणाऱ्या हाताला वारीच्या निमित्ताने विसावा मिळतो. टाळ-मृदंग आणि भजन-कीर्तनात मंत्रमुग्ध होऊन दररोजच्या धकाधकीच्या व्यवहारातून विश्रांती मिळते. पण कोरोनामुळे हे शक्य नव्हते.
यावेळी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, धनाजी बरगे, के. द. पाटील, पपु चरापले, नारायण पाटील, बाबूराव पाटील, आर. जी. चरापले, निवृत्ती पाटील, सोपान पाटील, व्यंकटेश बनछोडे, बाजीराव पाटील, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी...
कोरोना रोगाची तीव्रता काहीअंशी कमी झाली असली तरी, शंभर टक्के कमी आलेली नाही. त्यासाठी सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर यांचा वापर करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे कौलव पंचक्रोशीतील संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष धनाजी बरगे व के. द. पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी :
कौलाव (ता. राधानगरी) येथील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला रवाना झाले. त्यांना निरोप देताना सुशील पाटील, धनाजी बरगे, के. डी. पाटील, निवृत्ती पाटील आदी.