जातीयवादी सरकार हद्दपार करा: रमेश बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:14 AM2018-07-02T01:14:52+5:302018-07-02T01:14:55+5:30
हातकणंगले / आळते : नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, जीएसटी अशा जाचक अटी लावून देशातील सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने हैराण केले आहे. गो-हत्याच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या चार वर्षांत या सरकारने केली आहे. अशाप्रकारांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा या जातीयवादी सरकारला देशातून हद्दपार करा, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.
हातकणंगले येथे आयोजित केलेल्या राष्टÑीय कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बागवे बोलत होते.
ते म्हणाले, मोदी सरकारने देशातील तरुणांना व शेतकऱ्यांना खोटी, मोठमोठी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली. शेतकºयांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम या सरकारने केले. सामान्य माणसांचे भले करण्यापेक्षा उद्योगपतींना आश्रय देऊन देशाची लूट करण्याचे काम गेल्या चार वर्षांमध्ये हे सरकार करीत आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून संविधान बदलण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे, हे सरकार सर्वच पातळ््यांवर अपयशी ठर आहे असे रमेश बागवे यांनी सांगितले.
यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये कॉँग्रेसची राजकीय स्थिती आता भक्कम होत असून गटतट विसून एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यातून काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार येतील.
यावेळी राज्याच्या सरचिटणीस अॅड. मनीषा रोटे, बाजीराव सातपुते, भगवान जाधव, राजूबाबा आवळे, बादशहा मुजावर, संदीप कारंडे, अरुण जानवेकर, डॉ. सनत खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अमर पाटील, उत्तम पाटील, बाळगोंडा पाटील, शकील अत्तार, शशिकांत खवरे, राजू कचरे, विद्याताई चव्हाण, मनीषा पांडव, रमेश पाटोळे, युवराज पाटील, भैरू पवार, सुरेश नाईक, राजू भोसले, एस. के. माळी, पोपट इंगवले, दौलत पाटील, बबन पाटील, बाळासाहेब खाडे, संजय आवळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.