Kolhapur: हद्दपार संजय तेलनाडे राजकीय कार्यक्रमात, व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:34 PM2024-07-06T16:34:00+5:302024-07-06T16:34:27+5:30

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याने राजकीय कार्यक्रमात भाषण करण्यासह ...

Deported Sanjay Telnade at a political event in Kolhapur, the video went viral causing panic in the police force | Kolhapur: हद्दपार संजय तेलनाडे राजकीय कार्यक्रमात, व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ

Kolhapur: हद्दपार संजय तेलनाडे राजकीय कार्यक्रमात, व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याने राजकीय कार्यक्रमात भाषण करण्यासह अन्य ठिकाणी उपस्थिती लावल्याने शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

डबल मोक्का कारवाईतून जामिनावर बाहेर असलेल्या तेलनाडे याच्यासह टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. ४) न्यायालयात एका गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात हजर राहण्यासाठी तेलनाडे याला समन्स देण्यात आले होते. खटल्यातील साक्ष देऊन हद्दपारीच्या ठिकाणी न जाता तेलनाडे याने इचलकरंजी शहर काँग्रेस समिती येथे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावत भाषण केले. त्यानंतर महापालिकेतही तो गेला होता. एका राजकीय नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर त्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. याबाबतची माहिती घेऊन गावभाग पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलिसांना पत्र दिले.

दरम्यान, हद्दपारीची कारवाई केली असतानाही त्याने कार्यक्रमास हजेरी लावल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसांनी पथकासह त्या ठिकाणी धाव घेतली असता तेलनाडे निघून गेला होता, असे पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश अशोक पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.

Web Title: Deported Sanjay Telnade at a political event in Kolhapur, the video went viral causing panic in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.