लॉकडाऊनमध्ये जाहीर केलेली अर्थिक मदत बँक खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:27 PM2020-10-07T15:27:30+5:302020-10-07T15:31:48+5:30
bankingsector, help, labour, goverment, kolhapurnews , Coronavirus Unlock राज्य शासनाने लॉकडाऊन काळात नोंदीत कामगारांसाठी जाहीर झालेली अर्थिक मदत बँक खात्यात त्वरीत जमा करावी. याकरीता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले. आंदोलनातील हलगीचा कडकडाटामुळे हा परिसर दणाणला.
कोल्हापूर : राज्य शासनाने लॉकडाऊन काळात नोंदीत कामगारांसाठी जाहीर झालेली अर्थिक मदत बँक खात्यात त्वरीत जमा करावी. याकरीता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले. आंदोलनातील हलगीचा कडकडाटामुळे हा परिसर दणाणला.
राज्य शासनाने कोरोनाच्या बांधकाम कामगारांना तातडीच्या मदतीची गरज आहे. आॅनलाईन नोंदणीमधून बांधकाम कामगारांची लूट सुरू आहे, तसेच शासनाने कोरोनाकाळात पहिल्या टप्प्यात दोन हजार, तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये जाहीर केले होते. मात्र अजूनही सर्व नोंदीत कामगारांपर्यंत ही रक्कम पोहोचलेली नाही.
बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे टाकण्याचा वेग अतिशय मंद आहे. अनेकांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्या सर्व कामगारांच्या बँक खात्यात त्वरीत दोन हजार रुपये तरी टाकावेत. कामगारांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव व अर्जांवर त्वरीत कारवाई व्हावी. बोगस कामगार नोदणीला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करा.
अशा कामगारांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाकरीता लॅपटॉप किंवा टॅब उपलब्ध करून द्यावेत.आदी मागण्यांचा समावेश सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
य आंदोलनात प्रशांत आंबी, कृष्णा पानसे, योगेश कसबे, हरीश कांबळे, लक्ष्मण सावरे, अनिल मोरे, अनिल माने, अर्चना सावरे, रोशन नदाफ, बेबीताई कांबळे, अनिता माने, लता मोरे, पूजा खामकर, आनंद सातपुते, जयदीप निर्मळ, आदी सहभागी झाले होते.