कर्मचारी सहकारी पतसंस्थेत दीड कोटींच्या ठेवी
By admin | Published: February 20, 2017 12:18 AM2017-02-20T00:18:09+5:302017-02-20T00:18:09+5:30
‘क्लिन मनी’ अशी ताठर भूमिका अर्थमंत्रालयाने घेतली आहे. दरम्यान तुमसरातील एका कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासदांनी सुमारे दीड कोटींच्या ठेवी ठेवल्याची धक्कादायक माहिती आहे.
कोल्हापूर : दहावी-बारावीच्या मुलांनी वेळेचे योग्य नियोजन करून निकालाचे टेन्शन न घेता उरलेल्या दिवसांत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आनंदी मनाने परीक्षेला जावे. त्यामुळे मनावरील दडपण कमी तर होईलच तर उज्ज्वल यशही मिळेल, असे प्रतिपादन ‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग यांनी शनिवारी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोबोमेट प्लस हे होते. यावेळी दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सिंग हे लोकमत व महेश ट्युरोरियल लक्ष्यतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मार्गदर्शन सेमिनारमध्ये बोलत होते. ‘लोकमत’चे संस्थापक- संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’चे मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक संतोष साखरे, महेश ट्युटोरियल लक्ष्यचे प्रा. नरेश रेड्डी, संदीप गोसावी, संजय कुंभार, शंकर पणशीकर, कल्याणी साकलकल्ले, प्रा. विनोद पोरे, गजानन वेरुळकर, प्रीती पाटील उपस्थित होते.
डॉ. सिंग म्हणाले, परीक्षा म्हटले की टेन्शन हे येतेच; परंतु त्याचा परिणाम आपल्या निकालावर होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सुरुवातीलाच अभ्यासाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करायला हवे. कोणत्या विषयाला, प्रकरणाला किती वेळ द्यावयाचा त्याचे अचूक नियोजन करून आत्तापासून अभ्यास करायला हवा. आत्मविश्वास वाढविण्यासाठी मागील परीक्षांचे पेपर सोडविणे फायदेशीर ठरते. संकटांना घाबरून पळ न काढता त्यांना आव्हान समजून मात करण्यासाठी सज्ज राहायला हवे. उरलेल्या दिवसाचे योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने अभ्यास करा.
विद्यार्थी व पालकांच्या नात्याविषयी बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवे. त्यांनी आत्मविश्वास कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नये. आजूबाजूचे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या मुलांना आहे तसे स्वीकारा. त्यांचा क्षमता लक्षात घेऊन सकारात्मक विचार केल्यास अनेक प्रश्नांवर आपोआप उत्तरे मिळत जातील. मुलांनीही पालकांप्रती कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवून वागावे. त्यांचा त्याग लक्षात घ्यावा. अभ्यास करणे ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवून अभ्यास करा. यशोशिखर गाठताना नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत कशा परावर्र्तित होतील, याकडे अधिक लक्ष द्यावे. परीक्षाकाळात आहारावर लक्ष द्यावे. आहारात घरगुती सात्त्विक जेवण व फळांचा समावेश असावा. दरम्यान, यावेळी रोबोमेट प्लस या सॉफ्टवेअरमुळे अभ्यासात कशी मदत होते याची माहिती व्हिडिओद्वारे दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मोफत रोबोमेट प्लस मार्गदर्शन व्याख्यान व बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी प्रास्ताविकात सेमिनारच्या आयोजनामागील उदेश सांगितला. विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा असून, ’लोकमत’तर्फे दरवर्षी त्यांच्यासाठी मार्गदर्शनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
‘लोकमत’ने आज
लोकमन जिंकले
‘महेश ट्युटोरियल लक्ष्य’चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. सुरेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमास लाभलेला प्रतिसाद पाहून ‘लोकमत’च्या या आयोजनाचे चांगलेच कौतुक केले. ‘लोकमत’ने आज लोकमन जिंकले, असे ते म्हणाले.