२९०० कोटींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा

By admin | Published: January 7, 2017 01:04 AM2017-01-07T01:04:35+5:302017-01-07T01:04:35+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र : ९०५ कोटींचे नवीन चलन

Deposits in old note banks of Rs.2900 crore | २९०० कोटींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा

२९०० कोटींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा

Next

कोल्हापूर : रद्द झालेल्या जुन्या ५०० व १०००च्या नोटांच्या माध्यमातून सुमारे २९०० कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांद्वारे चार करेन्सी चेस्टकडे जमा झाले आहेत. तसेच सुमारे ९०५ कोटी रुपयांचे नवीन चलन वितरीत झाले आहे. ‘नोटा रद्द’नंतरच्या ५० दिवसांतील हे चित्र आहे.
जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत आणि खासगी ३२ बँकांच्या ३७३ शाखा कार्यरत आहेत. जुन्या ५०० व १०००च्या ‘नोटा रद्द’चा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर या नोटा ५० दिवसांपर्यंत बँकांमध्ये जमा करून घेण्यात आल्या. यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र आणि रत्नाकर बँक लिमिटेड या चार करेन्सी चेस्ट कार्यरत होत्या. या ५० दिवसांच्या कालावधीत संबंधित जुन्या नोटांच्या माध्यमातून या चार करेन्सी चेस्टद्वारे सुमारे २९०० कोटी रुपये जमा झाल्या आहेत. तसेच विविध बँकांसाठी एकत्रितपणे सुमारे ११०० कोटी रुपये मिळाले. शिवाय सुमारे ९०५ कोटी रुपयांचे नवीन चलन वितरीत करण्यात आले. यामध्ये नव्या २०००, ५०० आणि १०० रुपयांच्या पटीतील नोटांचा समावेश होता. याबाबतचा अहवाल लवकरच रिझर्व्ह बँकेला सादर केला जाणार आहे. जमा झालेल्या जुन्या नोटांमध्ये जिल्हा बँक आणि नागरी बँकांमधील पैशांचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी १०० कोटी रुपयांचे नवीन चलन प्राप्त झाले आहे.

‘कॅशलेस’साठी ३१ गावांची निवड
केंद्र सरकारच्या आवाहनानुसार कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन आणि प्रबोधन करण्यासाठी बँकांकडून कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनी गावांची निवड केली आहे. त्यामध्ये दिंडनेर्ली, जैनापूर, दिगवडे, नागांव, हणबरवाडी, वाशी, तिळवणी, जैताळ, बारडगाव, नारेवाडी, दऱ्याचे वडगाव, शिये, चंदूर, शेळकेवाडी, नंदवाळ, उजळाईवाडी, नेबापूर, माळ्याची शिरोली, कागल, उचगाव, कोदे बुद्रुक, चिपरी, कुडित्रे, काडवे, गंगापूर, पेरिड, राजगोळी खुर्द, येळवण जुगाई, कसबा तारळे, सोनवडे, बुबनाळ या गावांचा समावेश आहे.

Web Title: Deposits in old note banks of Rs.2900 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.