गडहिंग्लजच्या ७९ लेकींसाठी ८ लाखांच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:18+5:302021-03-13T04:46:18+5:30

गडहिंग्लज : जागतिक महिला दिनानिमित्त गडहिंग्लज नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे लेक वाचवा अभियानांतर्गत शहरातील ७९ लेकींसाठी पालिकेने ७ ...

Deposits of Rs. 8 lakhs for 79 lakes of Gadhinglaj | गडहिंग्लजच्या ७९ लेकींसाठी ८ लाखांच्या ठेवी

गडहिंग्लजच्या ७९ लेकींसाठी ८ लाखांच्या ठेवी

googlenewsNext

गडहिंग्लज : जागतिक महिला दिनानिमित्त गडहिंग्लज नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे लेक वाचवा अभियानांतर्गत शहरातील ७९ लेकींसाठी पालिकेने ७ लाख ९० हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली आहे.

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्वाती कोरी होत्या.

याप्रसंगी ठेवींच्या २७ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत महिलांनी शपथ घेतली. महिलांचे समाजातील स्थान आणि मुलींचा जन्मदर याविषयी नगराध्यक्षा कोरी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास नगरसेविका सुनीता पाटील, नाझ खलिफा, शशीकला पाटील, शकुंतला हातरोटे, श्रद्धा शिंत्रे, रूपाली परीट, रेश्मा कांबळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, अवंती पाटील, अक्षय मोहिते आदींसह महिला उपस्थित होत्या.

वीणा कापसे यांनी प्रास्ताविक केले. काकासाहेब भुइंबर यांनी सूत्रसंचलन केले. क्रांतीदेवी शिवणे यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे पालिकेतर्फे लेक वाचवा अभियानांतर्गत ठेव पावती प्रमाणपत्रांचे वाटप नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेविका उपस्थित होत्या. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : १२०३२०२१-गड-०२

Web Title: Deposits of Rs. 8 lakhs for 79 lakes of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.