बाजार समितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत ५ कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:43+5:302021-04-22T04:24:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने जबाबदारी घेतल्यापासून अनावश्यक खर्चाला फाटा देत पाच ...

Deposits of Rs | बाजार समितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत ५ कोटींच्या ठेवी

बाजार समितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत ५ कोटींच्या ठेवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने जबाबदारी घेतल्यापासून अनावश्यक खर्चाला फाटा देत पाच कोटीच्या ठेवी ठेवल्याचे प्रतिपादन अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.

बाजार समितीच्या कागल येथील जनावरांच्या आठवडी बाजाराचे उद्‌घाटन बुधवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. रामनवमी व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाजार सुरू करण्यात आला. के. पी. पाटील म्हणाले, ‘‘समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात शेतकरी, व्यापारी व अडत्यांना विविध सोयी-सवलती देण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्रा. जालंदर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव जयवंत पाटील यांनी स्वागत केले. दगडू भास्कर यांनी आभार मानले. यावेळी कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, बी. एच. पाटील, सूर्यकांत पाटील, सचिन घोरपडे, दिगंबर पाटील, सुजाता सावडकर, काकासाहेब सावडकर, रमेश माळी, उपसचिव राहूल सूर्यवंशी, के. बी. पाटील, कनिष्ठ अभियंता अशोक राऊत आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : बाजार समितीच्या कागल येथील जनावरांच्या आठवडी बाजाराचा प्रारंभ बुधवारी अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सचिन घोरपडे, प्रा. जालंदर पाटील, युवराज पाटील, दगडू भास्कर, सूर्यकांत पाटील, बी. एच. पाटील, जयवंत पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२१०४२०२१-कोल-बाजार समिती)

Web Title: Deposits of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.