कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बीम्सच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:14+5:302021-05-30T04:21:14+5:30

बीम्स -सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसह अन्य रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत. मात्र, रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी ...

The Deputy Chief Minister of Karnataka took action against the Beams officials | कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बीम्सच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बीम्सच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

Next

बीम्स -सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसह अन्य रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत. मात्र, रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी बीम्सला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

पीपीई किट घालून कोरोना वाॅर्डात प्रवेश करून त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराबाबत माहिती घेऊन त्यांनी तेथील गैरव्यवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बीम्सला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, लोकांकडून तसेच वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरील तक्रारी पाहून मी आज जाणीवपूर्वक अचानक बीम्सला भेट दिली. पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना धीर दिला. येथील गैरव्यवस्थेबद्दल काय बोलावे कळत नाही. बीम्सचे प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. यापूर्वी एकदा त्यांना इशारा दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर बीम्सच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मग त्यांना काय ते सांगतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सवदी यांनी आपला संताप व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ, संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प आदी उपस्थित होते.

फोटो: बेळगाव बिम्स इस्पितळात उपमुख्यमंत्री सवदी यांनी भेट दिली त्यावेळी डी. सी. हिरेमठ आदी उपस्थित होते.

Web Title: The Deputy Chief Minister of Karnataka took action against the Beams officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.