देसावळेंची म्हैस, कुंभार यांची गाय ‘वारणा श्री’
By admin | Published: November 2, 2016 12:45 AM2016-11-02T00:45:25+5:302016-11-02T00:45:25+5:30
जातिवंत जनावरांचे प्रदर्शन : तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्यावतीने आयोजन
वारणानगर : तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्यावतीने आयोजित जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनात बहादूरवाडीच्या रमेश विष्णू देसावळे यांच्या म्हशीने ‘वारणा श्री म्हैस’ पुरस्कार तर नरसिंहपूरच्या संजय तानाजी कुंभार यांच्या गायीने ‘वारणा श्री गाय’ पुरस्कार मिळविला.
वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे, डॉ. नितीन मार्कंडेय, शिरवळचे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. अनिल उलेमाले यांच्याहस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, सचिव के. एम. वाले, संचालक एच. आर. जाधव, शिवाजीराव जंगम, राजवर्धन मोहिते, शिवाजीराव कापरे, अभिजित पाटील, एन. आर. पाटील, शिवाजीराव मोरे, आनंदराव घाटगे, अरुण पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, मोहन मगदूम, लालासो पाटील, जालिंदर पाटील, महेंद्र शिंदे, आनंदराव कुरणे, शोभा पाटील, शोभा साखरपे, पी. व्ही. कुलकर्णी, डॉ. एन. एस. वडजे, डॉ. ए. पी. कोटगीर उपस्थित होते. (वार्ताहर)