प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:07 AM2018-07-31T01:07:46+5:302018-07-31T01:07:52+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता.

'Deshmukh Pattern' will now come to the rescue: Inderjit Deshmukh today Retired: women, girls, training of students, Jagar of thoughts | प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

Next
<p>समीर देशपांडे।
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता. खंबाटकीच्या घाटात जीप आणि एसटीची टक्कर झाली. शेजारचे दोघे ठार झाले. याचा पाय मोडला, छातीला मार लागला. तशातही स्ट्रेचरवरून मुलाखत दिली; पण या अपघाताने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जणू पुनर्जन्मच झाला. आता हा नवा जन्म समाजाच्या भल्यासाठी सार्थकी लावण्याचा त्याने निर्धार केला आणि गेली २५ वर्षे इंद्रजित देशमुख नावाचा अधिकारी याच निर्धाराने कार्यरत राहिला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. देशमुख यांनी अवेळी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वेदनादायी ठरणारी आहे. देशमुख यांचे वडील दोन वेळा आमदार होते. सांगली जिल्ह्णातील खानापूर तालुक्यातील माहुली येथे घरची शेती. मनात आणलं असतं तर देशमुखी थाटात गावात रूबाब गाजवणं त्यांना अशक्य नव्हतं; पण विचार पक्का झाला होता आणि मग गटविकास अधिकारी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शिरोळचा कार्यभार स्वीकारला.
शिरोळनंतर कराडला गटविकास अधिकारी, कोल्हापुरात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जलस्वराज्य, उपआयुक्त विकास या सर्व पदांवर काम करत असताना आपण कुणासाठी काम करत आहोत याचे भान सुटले नाही. जोडीला ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर होते. एकीकडे शासकीय कामकाज पाहत असतानाच गावोगावी देशमुख यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला.
भ्रष्टाचारमुक्तीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि ग्रामविकासापासून ते राष्ट्रीय चारित्र्यापर्यंतची मांडणी होऊ लागली. पण ‘घेणार नाही, देणार नाही’ यामुळेही अडचण होऊ लागली आणि अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय झाला. आता प्रबोधनाचा देशमुख पॅटर्न जोमात राहणार हे नक्की.

शिवम् प्रतिष्ठानची स्थापना
नव्या पिढीला सुजाण करण्याची गरज असल्याने, मग कराड तालुक्यातील घारेवाडी इथं शिवम् प्रतिष्ठानची स्थापना झाली. हजारो युवकांसाठी शिबिरे, महिला, मुलींना प्रशिक्षण. वर्षभर उपक्रम सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचारांचा जागर सुरू असताना नाना पाटेकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत अनेकांशी संपर्क आला. हे सर्व सुरू असताना शासकीय जबाबदाऱ्या वाढतच होत्या.

 

Web Title: 'Deshmukh Pattern' will now come to the rescue: Inderjit Deshmukh today Retired: women, girls, training of students, Jagar of thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.