झटपट श्रीमंतीचा हव्यास अन्‌ ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:18+5:302021-04-21T04:24:18+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णाला जीवनदायी ठरणाऱ्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांकडूनच साखळी पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू ...

The desire for instant riches and the black market of ‘remedicivir’ | झटपट श्रीमंतीचा हव्यास अन्‌ ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार

झटपट श्रीमंतीचा हव्यास अन्‌ ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार

Next

कोल्हापूर : कोरोना रुग्णाला जीवनदायी ठरणाऱ्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांकडूनच साखळी पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. झटपट पैसे मिळवून श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या इंजेक्शनचा साठा करून बाहेर कृत्रिम टंचाई निर्माण करायची, नंतर लोकांच्या अडचणीचा गैरफायदा उठवत तेच इंजेक्शन तिप्पट, चौपट दराने काळ्या बाजारात विकायचे. हीच पद्धत या रॅकेटकडून अवलंबली जात आहे.

कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा सुरू आहे. याचा गैरफायदा घेऊन गरजूंच्या मुळावर पाय देऊन झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी पहाटे केला. अटक केलेला पराग पाटील हा शहरातील एका नामवंत रुग़्णालयाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये सेल्समनचे काम करतो. त्याचे वडीलही सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर दुसरा अटक केलेला योगीराज वाघमारे हा हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील एका आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचेही वडील हे शेतकरी असून, अटक केलेली दोघांच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे.

काळ्या बाजारात भरमसाठ विक्री

अटक केलेल्या रॅकेटकडून गेल्यावर्षीही कोरोना संसर्ग कालावधीत रेमडेसिविर या इंजेक्शनची काळ्याबाजारात भरमसाठ किमतीने मोठ्या संख्येने विक्री केल्याचीही माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण गेल्यावर्षीपासूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यातून गेल्या आठवड्यापासून हे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले होते.

११०० चे रेमडेसिविर १८ हजाराला विक्री

जप्त केलेले रेमडेसिविर इंजेक्शनवर छापील किंमत ५४०० असून, प्रत्यक्षात ती ११०० रुपयाला मिळतात; पण कृत्रिम टंचाई दाखवून तेच इंजेक्शन प्रत्येकी १८ हजारास विक्री केले जात होते.

इंजेक्शनची काळ्या बाजारात ‘एण्ट्री’

रुग्णाच्या गरजेनुसार संबंधित रुग्णालयाने विहीत नमुन्यात जिल्हा प्रशासनात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करावयाची आहे, त्यानंतर प्रशासनाकडृन संबंधित स्टॉकिस्टला त्या रुग्णालयास आवश्यक त्या प्रमाणात रेमडेसिविर देण्याच्या सूचना केल्या जातात. त्यानंतर त्या कोरोना रुग्णालयाला इंजेक्शन उपलब्ध होते; पण रुग्णालयातून रुग्णाला दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन सहा इंजेक्शनचे असते; पण तुटवड्याचे निमित्त पुढे करून संबंधित मेडिकल स्टोअर्स फक्त २ इंजेक्शन देतो व प्रिस्क्रिप्शन आपल्याकडे ठेवून घेतो. त्यामुळे उर्वरित इंजेक्शन त्या रुग्णाच्या नावावर खर्च टाकून ती काळ्या बाजारात भरमसाठ किमतीला विकली जात असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The desire for instant riches and the black market of ‘remedicivir’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.