दुहेरी साखर दराबाबत चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:19 AM2018-02-19T01:19:01+5:302018-02-19T01:19:01+5:30

Detection of double sugar rates | दुहेरी साखर दराबाबत चाचपणी

दुहेरी साखर दराबाबत चाचपणी

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाºया साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. राष्टÑीय साखर कारखाना फेडरेशनच्या मागणीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सकारात्मक असून, त्यांनी हे दोन दर कसे असावेत व दोन ग्राहक कसे ठरविता येतील, याबाबतची माहिती फेडरेशनकडे मागितली आहे.
साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असल्याने तिच्या दरावर सरकारचे नियंत्रण असते. साखरेचे दर ठरावीक किमतीच्या वर जाऊ दिले जात नाहीत. एकीकडे ऊसदरासाठी ‘एफआरपी’चा कायदा केला; पण साखरेचे दर अस्थिर राहिल्याने साखर कारखानदार अडचणीत येतात. उसाची बिले देण्यासाठी कारखान्यांना कर्जे काढावी लागतात. त्यांचे हप्ते व एफआरपीप्रमाणे दर देताना कारखानदारांची दमछाक उडते. यातून राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या चिमण्या कायमच्या थंडावल्या. साखर कारखानदारी वाचविण्यासाठी साखरेला ‘जीवनाश्यक वस्तू कायद्या’तून काढून तिचे दोन दर ठरविण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.
याबाबत ‘इस्मा’ व राष्टÑीय सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या वतीने केंद्रीय अन्न मंत्रालयाकडे मागणी केली होती. व्यक्तिगत (घरगुती) वापर व उद्योगासाठी साखरेचे दर वेगवेगळे ठरविण्यासाठी फेडरेशनने २२ डिसेंबर २०१७ रोजी केंद्राकडे मागणी केली. त्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. घरगुती व उद्योग असे ग्राहक कसे निवडावेत व दोन दर कसे असावेत, याबाबत आपल्या स्तरावरून अधिक माहिती देण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव जितेंद्र जुएल यांनी केली आहे.
मिठाईमध्ये दुप्पट कमाई
साधारणत: एक किलो मिठाईसाठी ४०० ग्रॅम साखर लागते. म्हणजे १६ रुपयांच्या साखरेवर ४०० रुपये किलोने मिठाई विकली जाते. त्यामुळे मिठाईसाठी सवलतीच्या दरातील साखर का? असा शेतकरी संघटनांचा सवाल आहे.

Web Title: Detection of double sugar rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.