तोतया पोलिसास सापळा रचून पकडले

By admin | Published: December 13, 2015 01:19 AM2015-12-13T01:19:38+5:302015-12-13T01:19:38+5:30

किणीतील संशयितास अटक : शाहूपुरी जिमखाना येथे दोघांना लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल

The Detective Police caught the police trap | तोतया पोलिसास सापळा रचून पकडले

तोतया पोलिसास सापळा रचून पकडले

Next

कोल्हापूर : क्राइम ब्रॅँचचा पोलीस असल्याची बतावणी करून किणी (ता. हातकणंगले)चा संशयित समीर इलाही अरब (वय ४०) याला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक येथे पकडले.
संशयित समीरने शुक्रवार (दि. ११) रात्री शिवाजी पार्कमधील शाहूपुरी जिमखानामध्ये दोघांना पकडून त्यांच्याकडील सात हजार ६०० रुपये व सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे १३ हजार ६०० रुपयांचा माल चोरून नेला होता. यापूर्वी समीर अरबवर २०१४ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जयसिंगपूर येथील शिवाजी आयलू नेमाणे (२७, रा. नववी गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ, मूळ गाव कुलाळवाडी, ता. जत, जि. सांगली) हे व त्याचे मित्र शुक्रवारी रात्री कामानिमित्त एस. टी. बसने मध्यवर्ती बसस्थानक येथे आले होते.
त्यावेळी ते वटेश्वर मंदिर येथून जात होते. त्यावेळी अंदाजे ३५ ते ४० वर्षांचा अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलीस आहे’ असे सांगून त्याने ‘महाराष्ट्र पोलीस’ असलेले किचन व शिट्टी त्यांना दाखविली. ‘तुमच्याकडे चोरीचे दागिने आहेत,’ असे सांगून नेमाणे व त्यांच्या मित्राला शिवाजी पार्क येथील शाहूपुरी जिमखाना मैदानाजवळ नेले.
तेथे या दोघांकडील सात हजार ६०० रुपये व मोबाईल असा माल घेऊन तो निघून गेला.
यानंतर शिवाजी नेमाणे व त्यांचे मित्र पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना हा घडलेला प्रकार कथन करून शिवाजी नेमाणे यांनी फिर्याद दिली. ं यानंतर पोलिसांनी अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा अल्बम त्यांना दाखविला. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्राने समीरला ओळखले.
त्यानुसार शनिवारी रात्री गुन्हे शोध पथकाने (डी.बी.) मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचला.
त्यावेळी संशयित समीर अरब हा दुसरे सावज शोधत असताना पोलिसांनी त्याला पकडले.
याप्रकरणी संशयित समीर अरब याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम ३९२ नुसार ‘जबरी चोरी’ व १७० नुसार (तोतया पोलीस) असा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

Web Title: The Detective Police caught the police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.