पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लढा उभारण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:49+5:302021-08-02T04:09:49+5:30
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीकाठावरील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबरोबरच संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी घटप्रभा खोऱ्याचे नियोजन व्हावे यासाठी लढा उभारण्याचा निर्धार गडहिंग्लज तालुक्यातील ...
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीकाठावरील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबरोबरच संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी घटप्रभा खोऱ्याचे नियोजन व्हावे यासाठी लढा उभारण्याचा निर्धार गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त व कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई होते.
घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीतर्फे येथील गडहिंग्लज बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक झाली.
बैठकीत पूरबाधित गावांच्या प्रतिनिधींनी आपल्या व्यथा व अडचणी मांडल्या. सविस्तर चर्चेअंती दोन वर्षांपासून सुरू असलेली पुनर्वसनाची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिरण्यकेशी काठावरील गावांची पूररेषा निश्चित करावी व पूररेषेच्या आतील सर्व कुटुंबांचे न्याय्य पुनर्वसन करावे आणि घटप्रभा खोऱ्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय झाला.
चर्चेत माजी सभापती विजयराव पाटील, माजी उपसभापती विद्याधर गुरबे, ‘दानिविप’चे अध्यक्ष रमजान अत्तार, शिवसेनेचे वसंत नाईक, वंदन जाधव, बजरंग पुंडपळ, प्रशांत देसाई, समीर बेडक्याळे यांनी भाग घेतला.
बैठकीस अजित बंदी, नागराज जाधव, ज्ञानराजा चिघळीकर, आझाद शेख, मल्लाप्पा गुलगुंजी, गजानन पाटील, महादेव रेगडे, अजित मगदूम, रमेश पाटील, सिदगोंडा पाटील, कृष्णा सावंत यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.
चौकट :
शुक्रवारी व्यापक बैठक
शुक्रवारी (६) गडहिंग्लज पंचायत समिती सभागृहात दुपारी २ वाजता पूरग्रस्त व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्याबरोबरच पूरबाधितांच्या सर्व्हेसाठी गावनिहाय बैठका आणि कोरोना परिस्थिती निवळताच पूरग्रस्तांची व्यापक परिषद घेण्याचा निर्णय यावेळी झाला.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील बैठकीत पूरग्रस्तांच्या न्याय्य पुनर्वसनासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी कॉ. संपत देसाई, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, राजन पेडणेकर, बजरंग पुंडपळ, वंदन जाधव, वसंत नाईक, अरविंद बार्देस्कर, ज्ञानराजा चिघळीकर आदींची उपस्थिती होती.
क्रमांक : ०१०८२०२१-गड-११