देऊळबंद राजकीय धुरळा बातमी जोडबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:33+5:302021-09-02T04:52:33+5:30
गेली दीड वर्षे मंदिरे बंद आहेत, त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल, बारमध्ये लोकांना मास्क काढावा ...
गेली दीड वर्षे मंदिरे बंद आहेत, त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल, बारमध्ये लोकांना मास्क काढावा लागतो, तिथेच एकाच साहित्याला अनेकजण हाताळतात. बाजारपेठांमध्ये कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत. असे असताना फक्त मंदिरांमध्येच कोरोना होतो, असे सरकारला वाटते का, तिथे भाविक फक्त हात जोडेल, दोन घटका शांत होऊन निघून जाईल. हवं तर एन्ट्री, एक्झीट वेगळी ठेवा, एकाचवेळी मोजक्या लोकांना प्रवेश द्या, नियम पाळण्याची सक्ती करा; पण आता मंदिरे उघडली पाहिजेत.
राहुल चिकोडे (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष)
----
हजार कोटींची उलाढाल ठप्प
श्रावणापासून सणांना सुरुवात होते. पुढे अगदी दिवाळी संपेपर्यंत मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. आर्थिक उलाढाल होते. एकट्या अंबाबाई मंदिरावर हॉटेल, निवासी संकुल, फूल-हारवाले, पूजा साहित्य विक्रेते, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, मिठाई, रिक्षाचालक, टपरीवाले, फेरीवाले असे अनेक घटक अवलंबून आहेत. देवस्थान समितीला वर्षाला २० ते २५ कोटींचे उत्पन्न मिळते. मंदिर बंद असल्याने ही उलाढाल थांबली आहे.
---