केर्लेत कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:54+5:302021-06-25T04:18:54+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचण्याची संख्या वाढविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे केर्लेत तीन दिवसांपासून ॲन्टिजन चाचण्या सुरू केल्या आहेत. बुधवारी ...

The devastation of Corona in Kerala | केर्लेत कोरोनाचा कहर

केर्लेत कोरोनाचा कहर

Next

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचण्याची संख्या वाढविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे केर्लेत तीन दिवसांपासून ॲन्टिजन चाचण्या सुरू केल्या आहेत. बुधवारी केलेल्या तपासणी १९८ जण निगेटिव्ह आल्या होत्या. बुधवारी ४२३ जणांच्या तपासण्या केल्या त्यामध्ये ८० जण पाॅझिटिव्ह आलेत. त्यामध्ये दहा वर्षांखालील १० मुलांचा समावेश आहे. गावात अचानक ८० रुग्ण पाॅझिटिव्ह सापडल्याने प्रशासन खडबडून जागे झाल्याने रुग्णांचे नियोजन लावताना चांगलीच धावपळ उडली आहे.

पाॅझिटिव्ह रुग्णांच्या प्रथम संपर्कात असणाऱ्या ६८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. गावातील मातंग वसाहत, हरिजन वसाहत आणि बळवंत गल्लीत रुग्णांची संख्या जादा आढळली आहेत. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना शाळेत अलगीकरण करण्यात आले आहे. वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आज दक्षता कमिटी व ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावात कोरोनाला गांभीर्य घेतले नाही तर कोरोनाचा कहर वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: The devastation of Corona in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.