पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:18 AM2017-09-03T00:18:39+5:302017-09-03T00:20:31+5:30

कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे.

 Develop tourism, cultural heritage policy | पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

Next
ठळक मुद्दे संभाजीराजे; जैसलमेर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांना आवाहनअनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. त्याअर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळांची उत्तम देखभाल करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी केले.
जैसलमेर (राजस्थान) येथे इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराज गजसिंह होते.
संभाजीराजे म्हणाले, पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखो कुटुंबांना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होऊ शकतात.

आपण आपला वारसा जतन करा, तो पर्यटकांना दाखवा आणि त्यायोग्य स्वत:चा विकास घडवून घ्या.
ते पुढे म्हणाले, सर्व राज्यांनी पुढाकार घेऊन धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत. वारसा स्थळांचा भूतकाळ ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशभरात लाखो पर्यटकांना ही स्थळे आकर्षित करतात. या वारसा वास्तू आपल्याला भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतील.

अंतिम उद्देश सामाजिक सुधारणा हाच पाहिजे
मराठ्यांना लष्करी यश मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सुधारणांच्या कार्यात झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास हेच दर्शवितो. आपल्या सर्वांचा अंतिम उद्देश, आर्थिकहित व सामाजिक सुधारणांचा असला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

Web Title:  Develop tourism, cultural heritage policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.