विकासपूर्ण योजनांनी राजेंद्रनगराचा कायापालट
By admin | Published: June 20, 2016 01:02 AM2016-06-20T01:02:17+5:302016-06-20T01:02:17+5:30
सतेज पाटील : साळोखेनगर ते कागल केएमटी बससेवा, विविध विकासकामांचे उद्घाटन
कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभागाचे विद्यमान नगरसेवक व परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांनी आपल्या प्रभागात ‘दत्तक झाड योजना’ अशासारख्या नावीन्यपूर्ण योजनेमुळे पर्यावरण संतुलनासाठी हातभार लावला आहे. तसेच या प्रभागात लहान मुलांना खेळण्यासाठी बगीच्यासह येथील कामगारवर्गाची गरज ओळखून सुुरू करण्यात आलेली साळोखेनगर ते कागल के.एम.टी. सेवा उपयोगी ठरणार आहे. अशा विविध विकासपूर्ण योजनेमुळे राजेंद्रनगर प्रभागाचा कायापालट होत आहे. त्यांचा अशा नावीन्यपूर्ण योजनेस माझा सदैव पाठिंबा राहील, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राजेंद्रनगर प्रभागात येथे रविवारी विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्रनगर येथे साळोखेनगर-एसएससी बोर्ड-शाहू नाकामार्गे कागल बससेवेचा प्रारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी शंभर गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्णा वाटप करण्यात आले. त्यासह परिसरातील शंभर नागरिकांना मोफत रोपवाटप करण्यात आले. छोट्या बागेचे उद्घाटन करण्यात आला. यासह महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा सांगितला. दत्तक झाड योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे परिसर हिरवागार होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास नगरसेवक प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेविका जयश्री साबळे, राजू साबळे, रोहित चौगुले, व्यंकट सूर्यवंशी, बबलू रजपूत, संतोष कांबळे, शक्ती माटुंगे, गोट्या नागटिळे, अर्जुन वाघमारे, दत्ता मिसाळ, राजू बागडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.