जोतिबा मंदिर विकासकामे जलदगतीने व्हावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:06+5:302021-03-13T04:45:06+5:30

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सध्या जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविला जात आहे. याअंतर्गत काळभैरव मंदिर जीर्णोद्धार, ड्रेनेज व्यवस्था, ...

Development work of Jyotiba temple should be done expeditiously | जोतिबा मंदिर विकासकामे जलदगतीने व्हावीत

जोतिबा मंदिर विकासकामे जलदगतीने व्हावीत

Next

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सध्या जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविला जात आहे. याअंतर्गत काळभैरव मंदिर जीर्णोद्धार, ड्रेनेज व्यवस्था, दीपमाळा, दीपगृह ही कामे मोजक्याच कारागिरांकडून संथगतीने होत आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर मातीचे ढिगारे, दगड, बांधकाम साहित्याने भरले आहे. त्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच दैनंदिन देवताकृत्ये, पालखी, धूपआरती यात अडथळे येत आहेत. काळभैरव देवाचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नारळ कोठेही फोडले जात असून, ते सर्वत्र विखुरले आहेत. या कामांमुळे मंदिरातील पाण्याचे कनेक्शन बंद असल्याने अभिषेक व मंदिर स्वच्छता राखली जात नाही. येत्या काही दिवसांत चैत्र यात्रा आहे. तरी गुढीपाडव्यापर्यंत ही विकासकामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष नवनाथ लादे, सहसचिव संदीप दादर्णे, तुषार झुगर उपस्थित होते.

--

फोटो नं १२०३२०२१-कोल-जोतिबा निवेदन

ओळ : कोल्हापुरातील जोतिबा परिसर हक्कदार पुजारी उत्कर्ष विश्वस्त समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना जोतिबा मंदिराची विकासकामे जलदगतीने करण्यात यावीत या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नवनाथ लादे, संदीप दादर्णे, तुषार झुगर उपस्थित होते.

--

Web Title: Development work of Jyotiba temple should be done expeditiously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.