कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 03:57 PM2019-09-17T15:57:54+5:302019-09-17T15:59:52+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.

Devendra Fadnavis claims that all issues of Kolhapur have been resolved | कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापुरात महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. छाया- आदित्य वेल्हाळ

Next
ठळक मुद्देकोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावामहाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.

यात्रेच्यानिमित्ताने फडणवीस यांचे सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले होते.ढोल, ताशांचा गजर, महाजनादेश यात्रेचे विशेष गीत, सर्वत्र फडकणारे भाजपचे ध्वज आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेलमधून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बसवर आले. तेथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे होते.

फडणवीस म्हणाले,चंद्रकांत पाटील आणि अमल महाडिक यांनी अनेक विकासकामे मंजूर करून आणली. कोल्हापुर आम्ही टोलमुक्त केले. अंबाबाईचा आराखडा मंजूर करून निधी दिला. एअर पोर्टवर भारतात कुठेही जाण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर यापुढच्या काळात कोल्हापूरला पुराशी सामना करावाच लागू नये अशी उपाययोजना केली जाणार आहे.

तत्पूर्वी स्टेशन रोडवरून अभिवादन करत निघालेली ही यात्रा दसरा चौकामध्ये आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी घेऊन यात्रेत सहभागी झाले. दसरा चौकामध्ये तसेच बिंदू चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. कॉमर्स कॉलेजसमोर रजनी मगदूम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून उमा टॉकीजमार्गे गोखले कॉलेजच्या चौकामध्येही त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

हॉकी स्टेडियम परिसरातून जाताना माजी स्थायी सभापती विजय साळोखे आणि त्यांच्या हॉकी खेळाडूंनी हॉकी स्टीक उंचावत तर निर्माण चौकामध्ये महापालिकेतील भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. संभाजीनगर चौकातील स्वागत स्वीकारून फडणवीस यांनी नागरिकांना अभिवादन करत थेट कळंबा गाठले. या ठिकाणी भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.

विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्रानी,सत्यजित कदम, अजित ठाणेकर, प्रताप कोंडेकर, शिवाजीराव बुवा, भारती जोशी,हेमंत आराध्ये, अ‍ॅड. संपतराव पवार, रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कचरे यांच्यासह भाजप, ताराराणीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Web Title: Devendra Fadnavis claims that all issues of Kolhapur have been resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.