देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 10:43 PM2022-11-15T22:43:13+5:302022-11-15T22:45:27+5:30

एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची रीमोटची बाहुली आहे. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, असा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह बंडखोरांवर हल्लाबोल चढवला.

Devendra Fadnavis is the director of Kalasutri Dolls; Attack of Sushma Andhare | देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Next

कोल्हापूर : सध्या सुरू असलेलं द्वेषमूलक राजकारण थांबणे गरजेचे आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची रीमोटची बाहुली आहे. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, असा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह बंडखोरांवर हल्लाबोल चढवला.

कुरुंदवाडमध्ये सुषमा अंधारे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाषणाला सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांसारखी अमराठी माणसं महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. भाजपचा मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखत आहे. कुलदीप सेंगलसारख्यांना वाचवणारी हीच होती. भाजप पक्ष हा गोडबोले नी साखर झेले असा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचे सांगतात, पण हाथरसमध्ये तरुणीचे रात्रीत अंत्यसंस्कार केले हे कोणते हिंदुत्व सांगतात? अशी विचारणा त्यांनी केली. 

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला. राहुल शेवाळे यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नारायण राणे यांची मुले मातोश्रीबद्दल बोलतात, पण कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही. गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, बिल्किस बानो असेल यांच्यावरून महिलांना किती तुच्छतेने पाहतात ते दिसते. एकनाथ भाऊ निर्णायक पदावर नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली आहेत. त्यांनी रिमोट चालू केला बोलतात, बंद केला ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत. 

भाजपचे आधी घराणेशाहीचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केला आणि आज तेच मंत्रिमंडळात आहेत. मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री 75 पैकी 15 घराणेशाहीतून निवडून आलेले आहेत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. दरम्यान, व्यासपीठावर माजी आमदार उल्हासदादा पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी नेते उपस्थित होते. 

Web Title: Devendra Fadnavis is the director of Kalasutri Dolls; Attack of Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.