कसबा बीड येथे श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी घेतले शंभो महादेवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:33+5:302021-08-24T04:29:33+5:30
शासकीय नियमानुसार मोजक्याच पुजाऱ्याच्या उपस्थितीत पहाटे पाच वाजता महापूजा, अभिषेक, आरती झाली. मंदिर परिसरात शासकीय नियमांचे कडक निर्बंध ...
शासकीय नियमानुसार मोजक्याच पुजाऱ्याच्या उपस्थितीत पहाटे पाच वाजता महापूजा, अभिषेक, आरती झाली. मंदिर परिसरात शासकीय नियमांचे कडक निर्बंध पाळण्यात आले होते. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून भाविकांनी शंभो महादेवाचे दर्शन घेतले. मात्र, दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
भोगावती, तुळशी नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले कसबा बीड हे गाव बाराव्या शतकातील प्राचीन भोजराजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. गावच्या मध्यभागी शंभो महादेवाचे प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेले कोरीव लेण्याचे दर्शन घडविणारे मंदिर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी पार पाडले जातात .
फोटो ओळ : कसबा बीड ( ता. करवीर ) येथील शंभो-महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त शंभो महादेवाचे भाविकांनी दर्शन घेतले.