Plastic ban-प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:13 PM2020-11-07T12:13:56+5:302020-11-07T12:16:14+5:30
Muncipal Corporation, Plastic ban, kolhapurnews प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली असून, शुक्रवारपासून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली असून, शुक्रवारपासून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोल्हापूर : प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली असून, शुक्रवारपासून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
राज्यशासनाकडून प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूची उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीस २०१८ पासून प्रतिबंध केला आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. आरोग्यविभागाची पाच पथके नियुक्ती केली आहेत.
प्लास्टिकसाठा जप्त करण्याबरोबरच प्रथम दंड ५ हजार रुपये, द्वितीय दंड १० हजार रुपये आणि तृतीय दंड २५ हजार रुपये आणि तीन वर्षांचा कारावास शिक्षा आहे. पथकामार्फत प्लास्टिक बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, तसेच थर्माकॉल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तूंचे विक्री करण्यास प्रतिबंध, जप्ती आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.