कुंभार बांधवांचा धडक मोर्चा, गणेशमूर्तींसाठी धरणाची माती मोफत न्या -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:52 PM2020-12-21T17:52:52+5:302020-12-21T17:55:21+5:30
Morcha Kolhapur- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदी करू नये या मुख्य मागणीसाठी श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे, दुसरीकडे शाडू मिळत नाही अशी कुंभार बांधवांची अडचण आहे. यावर मार्ग म्हणून कुंभार बांधवांनी गणेशमूर्ती बनवण्यासाठी धरणांमधील माती मोफत न्यावी, त्यासाठी कोणतिही रॉयल्टी द्यावी लागणार नाही. आठवड्यात ज्या धरणांची माती हवी आहे त्यांची तालुकावार यादी द्या, तहसीलदारांना त्याबाबतचे आदेश दिले जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी कुंभार बांधवांना दिली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदी करू नये या मुख्य मागणीसाठी श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात श्री गणेशमूर्तीच ट्रॅक्टरवर ठेवून आणण्यात आली होती. मी मूर्तीकार लिहलेल्या पांढऱ्या टोप्या घालून पाच हजारावर कुंभार बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.