‘जनसुराज्य’, ‘स्वाभिमानी’ पक्षांची मान्यता टिकविण्यासाठी धडपड

By admin | Published: September 30, 2015 01:04 AM2015-09-30T01:04:58+5:302015-09-30T01:07:47+5:30

त्रुटींची पूर्तता करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू

Dhadpad to save the identity of 'Janasurajya' and 'Swabhimani' parties | ‘जनसुराज्य’, ‘स्वाभिमानी’ पक्षांची मान्यता टिकविण्यासाठी धडपड

‘जनसुराज्य’, ‘स्वाभिमानी’ पक्षांची मान्यता टिकविण्यासाठी धडपड

Next


कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने रद्द केलेली पक्षाची मान्यता परत मिळविण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष व स्वाभिमानी शेतकरी पक्षाने धडपड सुरू केली आहे. आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया पक्षांच्यावतीने सुरू झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष म्हणून लढविण्यासाठी आणि चिन्ह वाटपात प्राधान्य मिळण्यासाठी राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणीकृत पक्षांना वर्षाला निवडणूक आयोगाला विशिष्ट नमुन्यातील माहिती द्यावी लागते. आयकर भरल्याची विवरणपत्रे, वार्षिक लेखापरीक्षण अहवाल आदी बाबींची पूर्तता करावी लागते, पण राज्यातील १९ पक्षांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली नसल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’चा समावेश आहे.
आयोगाने मंगळवारी कारवाईनंतर दोन्ही पक्षांच्या पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या दणक्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्ष स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही. मात्र, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे काही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे राहणार असल्याने या पक्षांतर्गत मंगळवारी दिवसभर जोरदार खलबते सुरू राहिली. कोणती माहिती निवडणूक आयोगाला अपेक्षित आहे, त्याची पूर्तता करण्याची प्रक्रिया दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.

Web Title: Dhadpad to save the identity of 'Janasurajya' and 'Swabhimani' parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.