‘धामणी’ची एकजूट; मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:10 AM2019-04-24T01:10:47+5:302019-04-24T01:10:52+5:30

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

'Dhamani' united; Text to voting | ‘धामणी’ची एकजूट; मतदानाकडे पाठ

‘धामणी’ची एकजूट; मतदानाकडे पाठ

googlenewsNext

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पाणीदार गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांनी बहिष्कारास शंभर टक्के पाठिंबा दिला. ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवीत कामात व्यस्त राहणेच पसंत केले. एकाच प्रश्नासाठी सामुदायिकपणे मतदानावर बहिष्कार घालण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या गावातील ११ हजार मतदान होऊ शकले नाही.
स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील हे आमदार असल्यापासून धामणी प्रकल्पाचे काम रखडत आले आहे. शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली असताना शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते प्रकल्प पूर्णत्वाचे आश्वासन द्यायचे, लोकांनी विश्वास ठेवून मतदान करायचे व पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशीच परिस्थिती राहिल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीच ४० गावे व वाड्यावस्त्यांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.
जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करूनही फारसा फरक पडला नाही. कृती समितीतील काहींनी बहिष्कार मागे घेतला; पण बहुतांश गावांत तो कायम राहिला. लढ्यास धामणी खोºयातील सर्व गावांनी पाठिंबा दिला. मात्र मतदानाच्या अगोदर काही तास कळे धरणातून बॅकवॉटरने पाणीपुरवठा होणाºया आकुर्डे, पणुत्रे, कोदवडे या गावांनी बहिष्कारास पाठिंबा देऊन मतदानात सहभागाचा निर्णय घेतला.
धामणी धरणाच्या पायथ्याशी असणाºया चौके, मानबेट, राही, कंदलगाव व याअंतर्गत येणाºया वाड्यांनी या लढ्यापासून अलिप्त राहून मतदान केले. म्हासुर्ली, बाजारीवाडी, सावंतवाडी, गवशी, कोनोली; तर पन्हाळ्यातील बळीपवाडी, पणोरे, वेतवडे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी ु गगनबावड्यातील धुंदवडे, खेरिवडे, केळोशी, जरगी, गारिवडे, आदी गावांत मतदानावर बहिष्कार टाकला.

कर्मचारी बसून वैतागले
कर्मचारी सोमवारी (दि. २२) मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर हजर झाले होते. मंगळवारी लवकर उठून सहा वाजता केंद्रावर सज्ज झाले; पण दिवसभर त्यांना मतदारांची प्रतीक्षाच करावी लागली. तब्बल अकरा तास कसे घालवयाचे, असा प्रश्न त्यांना होता. काहीजणांनी एकत्रित गप्पाटप्पा रंगविल्या, तर काहींनी मतदारांची वाट बघत बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

फटका कोणाला?
धामणी खोºयाचे कार्यक्षेत्र हे राधानगरी-भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे या बहिष्काराचा फटका कोणाला बसणार? कोणाच्या तरी जय-पराजयात हा बहिष्कार कारणीभूत ठरू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे.

Web Title: 'Dhamani' united; Text to voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.