केंद्र सरकारच्या समितीमध्ये धनंजय महाडिक, सहकारी कायद्यातील सुधारणेसाठी समिती अहवाल तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:04 PM2022-12-23T13:04:34+5:302022-12-23T13:05:01+5:30

विधेयकात बदल आणि दुरुस्ती सुचविण्याच्या समितीमध्ये खासदार महाडिक यांचा सहभाग झाला आहे.

Dhananjay Mahadik in the Central Government Committee, The Committee will prepare a report for the reform of the Co-operative Act | केंद्र सरकारच्या समितीमध्ये धनंजय महाडिक, सहकारी कायद्यातील सुधारणेसाठी समिती अहवाल तयार करणार

केंद्र सरकारच्या समितीमध्ये धनंजय महाडिक, सहकारी कायद्यातील सुधारणेसाठी समिती अहवाल तयार करणार

googlenewsNext

कोल्हापूर : बहुराज्य सहकारी संस्थांसाठीच्या कायद्यातील सुधारणेसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश झाला आहे. बहुराज्य सहकारी सोसायटीच्या कायद्यांमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या, कोणते बदल करायचे, याबाबत ही संयुक्त समिती अहवाल तयार करून तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार आहे.

देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे.

त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील निवडक खासदारांची एक संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली. देशभरातील सहकार चळवळीसाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे आहे. विधेयकात बदल आणि दुरुस्ती सुचविण्याच्या समितीमध्ये खासदार महाडिक यांचा सहभाग झाला आहे.

Web Title: Dhananjay Mahadik in the Central Government Committee, The Committee will prepare a report for the reform of the Co-operative Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.