भीमा कारखान्यातील गैरव्यवहारामुळे धनंजय महाडिक तरुंगात जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:37+5:302021-04-30T04:31:37+5:30

: कागल : महालक्ष्मी दूध संघ अडचणीमध्ये आला त्याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण केले गेले. या संघाकडून कोणाचेही देणे ...

Dhananjay Mahadik will go to jail due to malpractice in Bhima factory | भीमा कारखान्यातील गैरव्यवहारामुळे धनंजय महाडिक तरुंगात जातील

भीमा कारखान्यातील गैरव्यवहारामुळे धनंजय महाडिक तरुंगात जातील

Next

:

कागल :

महालक्ष्मी दूध संघ अडचणीमध्ये आला त्याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण केले गेले. या संघाकडून कोणाचेही देणे देण्याचे शिल्लक राहिलेले नाही. महालक्ष्मी दूध संघावर खोटेनाटे आरोप करणारे माजी खा. धनंजय महाडिक भीमा साखर कारखान्यातील गैरव्यवहारामुळे नजीकच्या काळात तुरुंगातच जातील, असे प्रत्युत्तर मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिले आहे.

कागलमध्ये गोकूळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.

नगराध्यक्ष जमादार म्हणाले महालक्ष्मी दूध संघाचे आता दुसरी व्यवस्था करून एक लाख लिटरवर संकलन सुरू आहे. आमच्यावर आरोप करणारे माजी खा. धनंजय महाडिक यांनी पंढरपूरच्या भीमा कारखान्यावर 400 कोटी रुपये कर्ज केले आहे. एफ.आर.पी. दिली नाही म्हणून साखर आयुक्तांनी साखर जप्त करून बिले भागवण्याची तयारी सुरू केली आहे. हे खोटे असेल तर कोणतीही शिक्षा मी भोगण्यास तयार आहे.

चौकट...........

● विठ्ठल-रुक्माई पतसंस्था मोडून खाल्ली

सत्ताधारी आघाडीचे उमेदवार रणजित पाटील यांनी महालक्ष्मी दूध संघावर मुरगूडच्या मेळाव्यात टीका केली होती. त्यांनी तर विठ्ठल- रुक्माई पतसंस्था मोडून खाल्ली. शासनाचे पॅकेज घेऊन त्यांनी ठेवीदारांसह शासनालाही फसविले. संचालकांना फास लावला. एक संचालक धक्क्याने मृत्यू पावला, अशाने आम्हाला शिकण्याची आवश्यकता नाही. अशी टीका नगराध्यक्ष जमादार यांनी केली.

फोटोओळी

कागलमध्ये गोकूळ दूध संघ ठरावधारकांच्या प्रचार बैठकीत मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे भाषण झाले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, युवराज पाटील, भय्या माने उपस्थित होते.

Web Title: Dhananjay Mahadik will go to jail due to malpractice in Bhima factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.