मनाविरुद्ध लग्न केले तरी ‘धनंजय’ आमचेच! - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 01:22 AM2019-01-26T01:22:44+5:302019-01-26T01:23:43+5:30

धनंजय महाडिक यांनी मनाविरुद्ध लग्न केले असले तरी ते आमचेच असून, त्यांच्यावर आमचे प्रेम असल्याचे सूचक वक्तव्य करीत काळाच्या उदरात काय दडले आहे, हे कोणालाच माहीत नसते. राजकारणात रात्रीत बदल होत

'Dhananjay' is our marriage! - Chandrakant Patil: | मनाविरुद्ध लग्न केले तरी ‘धनंजय’ आमचेच! - चंद्रकांत पाटील

मनाविरुद्ध लग्न केले तरी ‘धनंजय’ आमचेच! - चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्याच्या मुलीच्या लग्नात मिरविण्याची हौस : जयंत पाटील यांचा टोला

कोल्हापूर : धनंजय महाडिक यांनी मनाविरुद्ध लग्न केले असले तरी ते आमचेच असून, त्यांच्यावर आमचे प्रेम असल्याचे सूचक वक्तव्य करीत काळाच्या उदरात काय दडले आहे, हे कोणालाच माहीत नसते. राजकारणात रात्रीत बदल होत असतात, असे संकेतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. दुसºयाच्या मुलगीच्या लग्नात मिरविण्याची हौस अनेकांना झाली आहे; पण अलीकडे माहेरची माणसेच अधिक घोटाळा करतात, याचे ध्यान ‘धनंजय’ ठेवा, असा टोला राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

भीमा कृषी प्रदर्शनाच्या शुक्रवारी उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील व जयंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपची काय दिशा राहणार, याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दांत संकेत दिले. मंत्री पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांनी राष्टÑवादीची उमेदवारी घेतल्याने येथे येताना काय बोलायचे, हा विचार करत होतो. जे बोलू ते आपण बोललोच नाही, असे न म्हणण्याचा माझा शिरस्ता आहे. ‘सैराट’ सिनेमात मनाविरुद्ध लग्न करणाºया मुलगी व जावयाचा आई-वडिलांनी सुपारी देऊन खून केला.

या सिनेमाचा शेवट काय करावा असे आपणाला विचारले असते तर असे नाही चालणार; मुलगीला रागावलो असतो, जावयाला खूप शिव्या घातल्या असत्या; पण शेवटी आपली मुलगी म्हणून घरी घेऊन आलो असतो. तसे महाडिक यांनी आमच्या मनाप्रमाणे लग्न केले असते तर त्यांना ‘इम्पाला’ गाडी दिली असती; पण त्यांनी मनाविरुद्ध लग्न केले तरी शेवटी ती आपलीच मुलगी असल्याने ती सुखात राहावी, अशी आमची इच्छा आहे. भाजप व शिवसेनेची युती होणार आहे. आम्ही आडमुठे नाही. कोल्हापूरची जागा शिवसेनेला जाणार आहे. युतीचा जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी प्रामाणिकपणे सगळे प्रयत्न करीन; परंतु दुसºया बाजूला आमच्या घरातील मुलगी असल्याने तिच्यावर आमचे प्रेम राहणारच.

जयंत पाटील म्हणाले, दुसºयाची मुलगी आपली म्हणून लग्नात मिरविण्याची इच्छा अनेकांना झाली आहे; पण अलीकडे माहेरची माणसेच अधिक घोटाळा करतात. मुलगीला नवºयापासून वेगळे राहण्याचा सल्ला देणाºया आर्इंची संख्याही काही कमी नाही; पण खºया पत्नीला नवºयाची कष्टाची भाजीभाकरी असू दे, त्याने कष्टाने मिळविलेली बैलगाडी ‘इम्पाला’पेक्षा फार मोठी असते, हे धनंजय महाडिक यांच्यातून आम्हांला कळले आहे. महाडिक यांच्याबद्दल माझ्या मनात काही अडचण वाटत नसून कामाला लागण्याचा सल्लाही पाटील यांनी दिला.

मोदींचा नव्हे, जयंत पाटील यांचा वचननामा
सरकारचा शेवटचा काळ आल्याने धडपड सुरू आहे. भविष्यात शेतकºयांच्या खात्यावर पाच-पंधरा हजार आले तर आपणाला नवल वाटणार नाही. शेतीमालाला आधारभूत किमतीचा प्रश्न गंभीर आहे; पण काळजी करून नका. निवडणुकीनंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत आपलेच सरकार आहे. शेतकºयांना उत्पादन खर्चापेक्षा जादा पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, हा नरेंद्र मोदींचा नव्हे, जयंत पाटील यांचा वचननामा असल्याचा टोला जयंत पाटील यांनी हाणला.

‘धनंजय’वर सर्वजण मंगलाष्टका टाकतील
मुलगीने मनाविरुद्ध लग्न केले, या पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचे कोडे कळले नाही; पण धनंजयच्या लग्नाला मंगलाष्टका टाकायला सर्वजण येतील, असे महादेवराव महाडिक यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दुरुस्त व्हा... महाडिकांची झोळी मोठी
धनंजय महाडिक देशात विक्रमी मतांनी विजयी होतील, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. काहीजण नाराज असले तरी त्यांनी दुरुस्त व्हावे. महाडिकांची झोळी मोठी आहे, सर्वांनी अनुभव घेतला. अनेकांना निवडून आणले; पण जयंतराव काळजी करू नका, तुम्ही दिलेल्या उमेदवारीला गालबोट लागणार नाही, असा विश्वास महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला.


राष्ट्रवादीची पाठ... भाजपची मांदियाळी
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला राष्टÑवादीच्या महिलाध्यक्ष संगीता खाडे वगळता आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी दांडी मारली; पण भाजपच्या शहराध्यक्षांसह नगरसेवकांची मांदियाळी व्यासपीठावर होती.

Web Title: 'Dhananjay' is our marriage! - Chandrakant Patil:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.