Dhangar Reservation: कोल्हापुरातील पट्टणकोडोलीत धनगर बांधव शेळ्यामेंढ्यांसह उतरले रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 05:43 PM2023-09-25T17:43:35+5:302023-09-25T17:44:51+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज बांधव धनगर आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये सुरु असलेल्या उपोषणाला ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज बांधव धनगर आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये सुरु असलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीत धनगर समाज बांधव शेळ्यामेंढ्यांसह रस्त्यावर उतरले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
जनजातीय कार्य मंत्रालयाचा वार्षिक अहवालात धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात आहे, त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेकडून उपोषण सुरु आहे. आंदोलनाचा कालावधी वाढत गेल्याने आता धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत.
धनगर समाजाच्या या मागणीला मात्र, आदिवासी समाज संघटनाकडून विरोध सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्त्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. शासनाने धनगर समाजाला आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, असे स्पष्ट मत झिरवाळ यांनी व्यक्त केले होते.