धनगर समाज एकवटला! एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:21 AM2020-10-03T02:21:38+5:302020-10-03T02:22:02+5:30

कोल्हापुरात पहिली गोलमेज परिषद : एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

Dhangar society united! S. T. Cross-border battle for category reservation | धनगर समाज एकवटला! एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

धनगर समाज एकवटला! एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

Next

कोल्हापूर : आतापर्यंत खूप सोसले, येथून पुढे नाही. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच ‘एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण, धनगर सारा एक’ या घोषणेसह संपूर्ण समाज पिवळ्या झेंड्याखाली एकवटेल, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत करण्यात आला. ३२ पोटशाखा आणि तितक्याच संघटना व नेत्यांमध्ये विभागलेला समाज येथून पुढे एकमुखाने आरक्षणाचा लढा लढेल आणि जिंकेल, असा ठरावही टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. धनगर समाजाला सध्या असलेले एन. टी. आरक्षण एस. टी. प्रवर्गात मिळावे म्हणून आता आरपारची लढाई करण्यासाठी वज्रमूठ यावेळी बांधण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत धनगर आरक्षण समन्वय समितीची गोलमेज परिषद झाली. गांधीजयंतीचा मुहूर्त साधून भरवलेल्या या परिषदेत माजी मंत्री अण्णा डांगे, राम शिंदे यांच्यासह राज्यातील समाजाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. आपल्यात दुही असता कामा नये, एकजुटीने आवाज उठवला तरच सरकारवर दबाब येणार आहे, अन्यथा कधीही आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही परिषदेने दिला.
माजी मंत्री अण्णा डांगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येतो, मग आपण का नाही? आपणही एकत्र येऊन अडवणूक का होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी दबाबगट तयार झाला तरच आरक्षण मिळेल, असे सांगितले.

परिषदेतील ठराव
1. ‘धनगर सारा एक’ या भावनेतून ३२ पोटशाखा, संघटना एकत्र येणार
2. गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी पुन्हा एकदा संघटनांची बैठक
3. शेळ्या-मेंढ्या चोऱ्या रोखण्यासह चराई व संरक्षण कायद्याची मागणी
4. उच्च न्यायालयातील सुनावणी रोजच्या रोज होऊन निकाली काढावी.

Web Title: Dhangar society united! S. T. Cross-border battle for category reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.