धनगर आरक्षणप्रश्नी आक्रमक पवित्रा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:23 AM2020-12-31T04:23:37+5:302020-12-31T04:23:37+5:30

शिरोली : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे; पण यशवंत सेना आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार ...

Dhangar will take the reservation issue aggressively | धनगर आरक्षणप्रश्नी आक्रमक पवित्रा घेणार

धनगर आरक्षणप्रश्नी आक्रमक पवित्रा घेणार

Next

शिरोली : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे; पण यशवंत सेना आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही. येत्या काळात आणखी आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी बुधवारी दिला. ते यशवंत सेनेच्या कोल्हापूर जिल्हा आढावा बैठकप्रसंगी बोलत होते. यशवंत सेनेचे जिल्ह्यात कार्यक्षेत्र वाढवून गाव तिथे शाखा स्थापन करा, जिथे धनगर समाजावर अन्याय होईल तिथे आक्रमक भूमिका घ्या, असे आवाहन सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख राजेश तांबवे होते. यावेळी गडदे म्हणाले स्व. बी. के. कोकरे यांनी जातीसाठी आपली संपूर्ण हयात घालवली. त्यांचे विचार प्रत्येक तरुणाने आत्मसात करण्याची गरज आहे. धनगर आरक्षणाचा मुद्द्यावर प्रत्येक जण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे; पण यशवंत सेना आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही. येत्या काळात आणखी आक्रमक पवित्रा घेतला जाईल.

पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख राजेश तांबवे म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकांमध्ये यशवंत सेना स्वबळावर लढणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय काळे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत वळकुंजे, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख संभाजी बन्ने, हातकणंगले तालुका प्रसिद्धीप्रमुख अंकुश लांडगे यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी यशवंत सेना राज्य खजिनदार बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख डॉ संदीप हजारे, माजी जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीबा पाटणे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष ललिता पुजारी, उपजिल्हा प्रमुख गंगाराम हजारे, जिल्हा संघटक तम्मा शिरोळे, हातकणंगले तालुकाप्रमुख पै. राहुल माने, माजी जिल्हा संघटक वैभव हिरवे उपस्थित होते.

फोटो ३० यशवंत सेना शिरोली

ओळी :

अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, स्व. बी. के. कोकरे यांच्या फोटोपूजनप्रसंगी माधव गडदे, राजेश तांबवे, अभिजित कोकरे व इतर उपस्थित होते.

Web Title: Dhangar will take the reservation issue aggressively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.